ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
सोमज हे गाव इगतपुरी तालुका पासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. सोमज गावाचा इतिहास हा फार जुना आहे. जुन्या काळात त्यावेळी कुंदे परिवाराने या कोकणा (गवळी) लोकांना ह्या गावचे नाव विचारले असता त्या बांधवांनी सांगितले इथे पहिला ठाकर समाज राहत होता. परंतु कुंदे परिवार मावळप्रांती असल्यामुळे समाज या शब्दाचा अपभ्रंश होऊन या गावचे नाव सोमाज असे पडले. आजही पुण्याकडील किंवा अहमदनगर जिल्ह्यामधील जुने लोक या गावाला मावळी भाषेत सोमाज असेच म्हणतात.
दिवसा मागून दिवस जात होते काही दिवसांनी लक्ष्मण गवळी (कोकणा) जडीबुटी वाला जाणकार होता आणि आदिवासी समाजास हा निसर्ग पूजक असल्यामुळे तो झाडे झुडपे, प्राणीमात्रांना वास्तवास देव मानणारा असल्यामुळे गवळी कुटुंबीय काळोबाची पूजा करायचे व त्यावरच त्यांची श्रद्धा असे.काळोबा म्हणजेच भैरोबा आदिवासींचे कुलदैवत तर अशा त्या काळोबाची ते मनोभावे पूजाअर्चा करत असत.
लक्ष्मण गवळी हा अविवाहित असून त्यांनी संन्यास मार्ग पत्करला होता ते दरवर्षी होळीच्या दिवशी त्या टेकडीवर होम करत असे. कुंदे परिवारातील सर्व लोक श्रद्धेने त्या होमासाठी जात असत आणि तेथील भैरोबाला (काळोबाला) नवस केल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा होती.
अशा आनंददायी वातावरणात जगत असताना अचानक गावाला कोणाची तरी दृष्ट लागली आणि गावात महामारी पसरली त्या काळात दवाखाने किंवा कुठल्याही प्रकारची सोय नसल्यामुळे कोकणा (गवळी) समाजाचे बरेच लोक दगावले होते गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. माणूस माणसाजवळ थांबत नव्हता या महामारीत कोकणा (गवळी) समाजाची बरीचशी माणसं दगावली होती अशा परिस्थितीत कोकणा गवळी समाजाची वाचलेली काही माणसं त्यांच्या दिंडोरी गावाकडे परत निघून गेली.
फक्त हरिजन समाजाचे उबाळे परिवार व महादेव कोळी समाजाची कुंदे परिवाराच शिल्लक राहिले आणि कालांतराने समाज शब्दाचे अपभ्रंश होऊन गावाचे नाव सोमज असे झाले.
📍 सोमज गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:
गावात जिल्हा परिषद शाळेची संख्या : १ असून इयत्ता १ली ते ५ वी पर्यंत असून सदर शाळेत २८ मुले व ३२ मुली अशी एकूण ६० इतकी पटसंख्या आहे.
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
🛠️ सुविधा
पाणीपुरवठा:
गावात जल जीवन मिशन योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी केली असून गावांतर्गत कुटुंबाना नळाद्वारे पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो.
हगणदारी मुक्त गाव :
घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघड्यावर शौच करणाऱ्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.
भूमिगत गटार: शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.
अंगणवाडी : सोमज येथे १ अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत पाणी, वीज सुविधा उपलब्ध असून डिजिटल शिक्षण प्राथमिक धडे दिले जातात.
- सभागृह : आमदार यांच्या निधी गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी सामाजिक सभागृह निर्मिती केली असून ग्रामस्थांना मोफत सुविधा दिल्या जातात.
- यात्रा महोत्सव: दरवर्षी सोमज येथे मार्च मध्ये यात्रा उत्सव साजरा केला जातो.
- अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजना:
अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजनाचा माध्यमातून हाय मास्ट लाईट, कॉँक्रीट रस्ते, बंदिस्त गटारी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 25
- ST लोकसंख्या : सुमारे 994
कामगार वर्ग
- एकूण कामगार :
- मुख्य कामगार :
- गौण कामगार :
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
📲 सोमज ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!
ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:
Instagram: @**********
Facebook: ***********
फोटो गॅलरी





